पोलादपूर : दापोली येथून सकाळी कोकण कृषी विद्यापीठमधील प्रामुख्याने लिपिक कर्मचारी सहलीसाठी महाबळेश्वरला मिनीबसमधून निघाले होते. दापोली ते पोलादपूर असा प्रवास चांगला झाला. खेड आल्यानंतर सर्वांनी नास्ता केला. तेथून महाबळेश्वरकडे रवाना झाले. बसमध्ये सर्वजण मज्जा-मस्ती करत होते. त्याचवेळी मातीच्या ढिगाऱ्यातून गाडीचे चाक गेले आणि गाडी घसरुन दरीत कोसळली. दाभिळ गावाजवळ आंबेनळी घाटात हा अपघात झाला. या अपघातात ३३ पैकी ३२ जणांचा मृत्यू झाला तर प्रकाश सावतं-देसाई हे एकमेव बचावले. त्यांनी झाडाची फांदी धरली आणि आपला जीव वाचवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाबळेश्वरला सहलीला जाण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठातील हे कर्मचारी मिनीबसमधून चालले होते. पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात त्यांच्या बसला मोठा अपघात झाला. आज सकाळी हा अपघात घडला. या अपघातातून प्रकाश सावतं-देसाई हे वाचले. त्यांनी दरीतून वर येत संपर्क साधल्याने या अपघाताची माहिती सर्वांना मिळाली. 


आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं


अपघातातून वाचलेले हे प्रकाश सावंत-देसाई यांनी अपघात कसा झाला याची माहिती दिली. झाडाची ती फांदी पावसामुळे मोडली असती तर मीही त्यांच्याबरोबर खाली गेलो असतो आणि गाडी खाली अडकलो असतो. मात्र, तसे काहीही झाले नाही. मी बसून राहिलो. त्या झाडावरुनच अंदाज घेतला कुठे काय आहे. झाडाच्या बुंध्याशी गेलो आणि जे सापडेल ते पकडत-पकडत, मातीत कसा बसा हात-पाय घट्ट रोवत मुख्य रस्त्यावर आलो. मला आठवतंय, त्या मातीवरुन आमच्या बसचा टायर घसरला. रस्त्यावर मातीचा जो ढिगारा करुन ठेवलाय ना त्याच्यावर टायर टेकला आणि गाडी डाव्या बाजुला घसरतच गेली.


आंबेनळी घाट । ३३ जणांनी गमावला जीव (पाहा व्हिडिओ)


प्रकाश सावंत-देसाई यांनी कथन केला प्रसंग