ठाणे : अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात खळ्ळ खटॅक आंदोलन सुरू करणा-या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड आता पोलिसांनी सुरू केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्यासोबत पाच ते सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.. शनिवारी ठाणे स्टेशन परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. 


तिकडे कल्याण डोंबिवलीमध्येही 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, नगरसेवक प्रकाश भोईर यांच्यासह 11 जणांना रामनगर पोलिसांनी तर कल्याणमधील 5 कार्यकर्त्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केलीय.