Jitendra Awhad : ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर (Mahesh Aher) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या चार कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.  (Thane Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश आहेर (Mahesh Aher) यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर गाठून चोप दिला होता. महेश आहेर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ( Thane News in Marathi ) आव्हाड कुटुंबाला संपवण्याची धमकी आहेर यांनी दिल्याचा आरोप आहे. तर आहेरवर गुन्हा दाखल करण्याची जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मागणी आहे.( Maharashtra News in Marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्याला मारहाण, जितेंद्र आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


महेश आहेर हा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त असून आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी त्यानं तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी आहेरला ताब्यात घेतलं. मात्र आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच पेटले. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटजवळ हल्ला केला. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आहेत. तर धमकीचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड वर्तक नगर पोलिसांत तक्रार दिली...या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.