ठाणे : विधान परिषदेचा आमदार करण्यासाठी १० कोटींची मागणी करणाऱ्या तिघांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. यात एका महिलेचा समावेश आहे. 


मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांची माणसं असल्याचं सांगत ठाण्यातील भाजप नगरसेवक मनोहर डुम्बरे यांच्याकडे १० कोटींची मागणी केली. त्यानंतर मनोहर डुम्बरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांनी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं सांगितलं. 


सापळा रचून या टोळीला अटक


त्यानंतर सापळा रचून या टोळीला अटक करण्यात आली. अनुज सज्जाद शिरगावकर, अनिलकुमार भानुशाली आणि अब्दुल्ला अन्सारी असे अटकेत असलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.