औरंगाबाद: पैसा कमावण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. औरंगाबादमध्ये अशाच एका व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक तामचीकर ( वय २८) असे या तरुणाचे नाव आहे. तो औरंगाबादच्या नारेगाव परिसरात वास्तव्याला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या अंगात देव येतो आणि कुठलाही आजार बरा करू शकतो, असे अशोक लोकांना सांगायचा. त्याने याच अंधश्रद्धेच्या जोरावर भोंदूगिरीचा धंदा थाटला होता. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने काही महिन्यांपूर्वी दुचाकी चोरायला सुरुवात केली. दिवसाउजेडी भोंदूगिरी आणि रात्री दुचाकी चोरी, असा दुहेरी उद्योग त्याने बरेच दिवस केला. अखेर पैशाच्या हव्यासामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांना अशोक चोरीच्या दोन ते तीन दुचाकी विकणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलिसांनी धाड टाकून अशोक तामचीकरचे बिंग फोडले. 


 या भोंदूबाबाचा दावा. एवढ्यावरच तो थांबला नाही. काही महिन्यांपूर्वी त्याने नवा धंदा सुरू केला. तो म्हणजे दुचाकी चोरीचा. दिवसा भोंदूगिरी आणि रात्री दुचाकी चोरी असा उद्योग त्याचा सुरू होता. मात्र पैशाच्या हव्यास त्याला नडला. चोरीच्या दुचाकी दोन ते तीन हजारात विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या तथाकथित भोंदूबाबाच्या दरबारात धाड टाकली आणि त्याचं बिंग फोडले. 


चोरीसाठी अशोकला त्याचा एक भक्तच मदत करायचा. या दोघांनी आतापर्यंत किती दुचाकी चोरल्या आहेत, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. तसेच भोंदूगिरीच्या नावाने अशोकने किती लोकांना फसवले आहे, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.