उस्मानाबाद : खुलेआम बेकायदेशीर मटका  जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे पुढे आलेय. याचे स्टिंगऑपरेशन करण्यात आलेय. त्यामुळे पोलिसांचे भिंग फुटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मटका जुगार यासारख्या बेकायदेशीर धंद्यांमध्ये काही पोलीस आणि धंदेवाले यांची मिलीभगत असते हे पुन्हा एकदा उघड झालेय. उस्मानाबादमध्ये पोलीसच कसे हे धंदे सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत याचं स्टिंगऑपरेशन समोर आलंय. 


व्हिडीओ क्लिपमध्ये उस्मानाबादच्या मुरुम पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.आर. मोमीन मटका एजंटकडे पोलीस स्टेशनच्या आवारामधील सरकारी क्वार्टरमध्येच पैशाची देवाणघेवाण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पैशाच्या बदल्यात मटका एजंटला आरोपी न केल्याचंही पोलीस अधिकारी मोमीन सांगत असल्याचे या क्लिपमधून उघड होत आहे.
 
विशेष म्हणजे गेली नऊ वर्ष हा ए.आर.मोमीन मुरूम पोलीस स्टेशनमध्येच ठाण मांडून आहे. पोलीस कॉन्स्टेबल-बीट अंमलदार- ते सहायक पोलीस निरीक्षक पदावर जाईपर्यंत मोमीनची बदली झाली नाही. त्यामुळे या मोमीनवर कोणाचा वरदहस्त होता याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.