सिंधुदुर्ग  : ओखी चक्रीवादळ सिंधउदुर्गात हाहाकार माजवत आहे. काही वेळापूर्वीच या वादळामूळे समुद्राशेजारील घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त होते. आता या वादळामूळे मालवण बंदरात पोलीसांची गस्ती नौका बुडाल्याचेही समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दरम्यान यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाल्याचे समोर आले आहे.


लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये


६ डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनारी समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ञांनी दिलाय.


पावसाची स्थिती 


मुंबईसह सागरी किनाऱ्यांवर ४ तारखेला अंशत: तसेच ५ तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. ५ तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वाऱ्याची तीव्रता अधिक असेल.


नागरिकांनी सतर्क राहा 


त्याहीदृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल असं इशारा देणारं पत्रक सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलंय.