पुणे : कोरेगाव-भीमा प्रकरणी आरोपी असणाऱे मिलिंद एकबोटे यांना आज १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजीनगर कोर्टात आज मिलिंद एकबोटेंना हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी एकबोटेंची कोठडी मागितली. त्यावर कोर्टानं हा निर्णय दिला. 


पोलिसांनी काल अडीच महिन्यानंतर एकबोटेंना अटक केली होती. त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.