Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद(Maharashtra Karnataka Border Dispute) धक्कादायक वळणावर येवून पोहचला आहे.  महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी एसटी महामंडळाला एसटी बसेसची सेवा तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातून कोल्हापूर निपाणी मार्गे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी थांबविण्यात आलेल्या आहेत. मात्र, सांगली सोलापूर मार्गे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस सुरू आहेत. कर्नाटक सरकारनेही कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणारे एसटी थांबविल्या आहेत.
कोल्हापूर -निपाणी मार्गे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 660 बसेसच्या फेऱ्या पोलीसांनी दिलेल्या सुचनेनुसार थांबविण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देण्याऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने दिला होता. इतकचं नाही तर  महाराष्ट्राच्या वाहनांवर देखील हल्ला केला होता. पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे.  


दरम्यान, पुढच्या 24 तासात हल्ले थांबले नाहीत तर आमच्या संयमाला वेगळं वळण लागेल. याची जबाबदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची असेल. 48 तासात परिस्थिती सुधारली नाही तर माझ्यासह सर्वजण कर्नाटकतात जातील, असा अल्टीमेटमच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यांनी दिला आहे.