Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवानिमित्ताने देखाव्याच्या माध्यमामातून समाज प्रबोधन केले जाते. मात्र, कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाच्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सध्या लोकशाही आणि लोकशाही मधील विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसार माध्यमे यांचे अस्तित्व कसे धोक्यात आले आहे या संदर्भातला देखावा विजय तरुण मंडळाने साकारलेला आहे. यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.  


का बजावली पोलिसांनी नोटीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना चिन्ह आणि  आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे देखाव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त करून देखाव्यासंदर्भात आक्षेप घेत मंडळाला नोटीस बजावली आहे. 


मागील वर्षी ही पोलिसांनी जप्त केली होती या मंडळाच्या देखाव्याची सामग्री


मागील वर्षी देखील शिवसेनेमधील उभ्या फुटी नंतर शिवसेनेतील बंडखोरी बाबत चल चित्राच्या माध्यमातून याच मंडळ गणेशोत्सवामध्ये देखावा साकारला होता. मात्र पोलिसांनी त्याही वेळी या देखाव्या मधील सामग्री जप्त केली होती. आता पोलिसांनी नोटीस देताना मागच्या देखाव्याचा संदर्भ देऊन दोन गटात जर ते निर्माण झाला तर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असं नोटीस मध्ये स्पष्ट केले आहे. मात्र आम्ही लोकशाही पद्धतीने हा देखावा समाज प्रबोधनाच्या माध्यमातून साकारला असल्याचं मंडळाने स्पष्ट केल आहे.


गणरायाचे शिवसेनाभवनात उत्साहात आगमन


शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या शिवसेना भवनात आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करीत समस्त शिवसैनिकांच्या हस्ते भक्तीभावाने आणि आनंदाची उधळण करीत गणरायाचे आगमन झाले. यावेळी मंत्रोपचाराचा आणि गणरायाचा गजर करीत शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. अतिशय मोहक अशा सजावटीत बाप्पांना विराजमान करण्यात आले. यावेळी शहरातील सर्वच भागातून उपस्थित असलेले शिवसैनिक पदाधिकारी तसेच उपशहर प्रमुखांच्या हस्ते यावेळी श्रींची पूजाअर्चा करण्यात आली. संपूर्ण पुण्यात गणरायाच्या या आगमनाची उत्साहाने आणि आनंदाने उधळण सुरू असतांना शिवसेना भवनातही तितक्याच जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की हिंदू धर्माच्या सण परंपरा महायुती सरकार आल्यानंतर अजून मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहेत. याचेच प्रतीक म्हणजे शिवसेना भवनात आज साक्षात गणपती बाप्पा विराजमान झालेत हे सरकार असंच कायम राहू दे आणि सामान्य जनतेला न्याय हक्कासाठी लढण्यासाठी बळ मिळू दे ही प्रार्थना गणरायाकडे केली. असंख्य शिवसैनिक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.