मुंबई : देश कोरोना व्हायरस संकटापासून सावरण्याचा प्रयत्न करत आहे तोपर्यंत चक्रवाती तूफान तौत्केने भारतात हजेरी लावली. या वादळाने अनेक ठिकाणी खूप नुकसान केले आहे. या वादळा दरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत. यापैकी काही व्हिडीओ हृदयात धडकी भरणारे आहेत. काही लोकांचा काही सेकंदाच्या फरकाने जीव वाचला आहे तर, काही ठिकाणी झाडे किंवा भिंतीच्या भिंती तुटून पडल्या आहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी पावसाला आणि वादळाला न जुमानता उभा राहून आपली कर्तव्ये पार पाडत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 परंतु या संकटाच्या वेळी पोलिसाने ज्या प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य बजावले आहे ते कौतुकास पात्र आहे.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता, मुसळधार पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यात हे पोलिस आधिकारी कसे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना आपल्या आयुष्याची अजिबात काळजी नाही. ते फक्त सेवा धर्म करत आहे.



व्हिडीओने लोकांची मने जिंकली


या व्हिडीओने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ भारतीय पोलिस सेवा अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ सामायिक करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आयें कितने प्रलय, तूफ़ान और आंधी, कर्तव्य पर सर्वदा अडिग है # khaakhi' याचा अर्थ असा की, किती ही वादळ किंवा संकट येऊ द्या परंतु खाकी नेहमी त्याच्या कर्तव्यावर ठाम असते.  यासह त्यांनी # khaakhi ही शेअर केला आहे. लोकं या व्हिडीओचा खूप आनंद घेत आहेत.


या व्हिडीओला अतापर्यंत 75 हून अधिक व्यूव्हस आले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या पोलिसाची तसेच संपूर्ण पोलिस डीपार्टमेंटचे कौतुक केले आहे. लोकांनी काय कमेंट्स केले ते पाहा.