कोल्हापूर : अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. शहरात पोलिसांवर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता ही धक्काबुक्की झाली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला झाल्याची दोन महिन्यांतील तिसरी घटना आहे.


अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता दोन जणांनी पोलीस निरीक्षक बाबर यांना जोरदार धक्काबुक्की केली. बिंदू चौक ते अयोध्या टॉकीज परिसरात अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेदरम्यान ही घटना घडली आहे. कोल्हापूर पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. ही हल्ल्याची तिसरी घटना आहे. त्यामुळे कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येत आहे.