Police Bharati Scam: मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेवेळी 'मुन्नाभाई' स्टाइल कॉपी करण्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 68 जणांन कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. अशाप्रकारे घोटाळे करुन पोलीस झाल्यास समाजाचे रक्षण कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आता या घोटाळेबाजांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे वृत्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर मुंबई पोलिसांनी राज्यातील सर्व  पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रात  पेपर फोडणाऱ्या टोळ्या विधार्थी यांची माहिती देण्यात आली आहे. यानंतर आत्ता पिंपरी चिंचवड  पोलिसांनी पेपर फुटील 68 आरोपींची यादी तयार केली आहे.


राज्यातील पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती घोटाळा झाल्याचं उघड झाल्यानंतर. पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरती ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केला आहे. त्याची यादी पिंपरी चिंचवड पोलीस आणि जाहीर केली आहे. या उमेदवारांना राज्यात इतर ठिकाणी कुठेही पोलीस भरती मध्ये सहभागी होता येणार नाही असे जाहीर केला आहे.


मागील पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीत गैरप्रकार झाल्याची सूचना एमपीएससी समन्वय समितीने दिली होती. त्याचा तपास अत्यंत कसोशीने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला होता. आज त्या सर्व घोटाळेबाजांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 


आम्ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात नाही पण हेच ते नराधम आहेत जे कष्टकरी प्रामाणिक विद्यार्थांच्या नोकऱ्यांवर डल्ला मारत आहेत. येत्या काळात आपल्या सर्वांना मिळून या टोळ्यांचा नायनाट करायचा आहे, असे आवाहन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या राहुल कवठेकर यांनी दिली.


यातील एकही नाव पुढील कोणत्याही नोकर भरतीत दिसले तर आपण लक्ष ठेवावे आणि आम्हालाही सूचित करावे, असे यावेळी सांगण्यात आले. 


पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या 6 पोलीस स्टेशनला  एकूण 68 आरोपींविरुद्ध  गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माहितीदेखील यावेळी देण्यात आली. 


इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत आधुनिक प्रकारे कॉपी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या आरोपीकडून मायक्रो माईक, इअरबड आणि पेन जप्त केले होते. परीक्षा केंद्रावर इलेक्ट्रानिक्स यंत्र घेऊन जाण्यास मनाई आहे. पण या भावी पोलिसांनी वर्गाबाहेर बॅगेत मोबाईल ठेवले होते.  परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांना हळू आवाजात कोणी तरी पुटपुटतंय. त्यांनी लगेचच वर्गातील झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. तर त्यांना चार उमेदवाऱ्यांचा कानात छोटे ब्ल्यू टूथ दिसून आलेत धक्कादायक म्हणजे त्या कॉपी बहाद्दरांना डॉक्टरांना नेलं असताना त्यांचा कानातून इअरबड काढण्यात आले.  त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुंबईतील भांडुप, मेघवाडी, गोरेगाव आणि कस्तुरबा मार्ग परिसरातील केंद्रांवर हा धक्कादायक प्रकार घडून आला.