मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मंत्रालयातून (Mantralay) मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रालयात बॉम्ब असल्याचं (Mantralay) निनावी कॉल पोलिसांना आला आहे. या अज्ञात कॉलमुळे मंत्रालयाबाहेरील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या निनावी कॉलनंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आहे. बॉम्बशोधक पथकाकडून तिनही इमारती आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला जात आहे. (Police were informed by an unknown call that there was a bomb in mantralay in mumbai) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा हा निनावी कॉल कंट्रोल रुमला आला. 9850050620 या नंबरवरुन कंट्रोल रुमला मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आजूबाजूच्या मंत्रालयातील मुख्य आणि इतर ठिकाणी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. बॉम्बशोधक पथकानेही घटनास्थळी पाचारण करत शोध घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. 


तसेच डॉग स्क्वॅडही मदतीसाठी पुढे आले आहे. डॉग स्क्वॅडमधील अबू आणि हिरा या श्वानांच्या मदतीने तपास घेतला जात आहे. दरम्यान मंत्रालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असूनही हा बॉम्ब मंत्रालयात कोणी आणि कशा प्रकारे नेण्यात आला, असा सवाल आता सर्व सामन्यांकडून उपस्थित केला जात आहे.