मुंबई : आज संपूर्ण देशभरात तसंच राज्यात देखील pulse polio Day साजरा करण्यात येतोय. यानुसार राज्यात अनेक ठिकाणी पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हांमध्ये आजपासून या अभियानाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आज त्यांच्या लहानग्यांना पोलिओचा डोस देण्याचं आवाहन करण्यात येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पल्स पोलिओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने राज्यातील पाच वर्ष आणि त्या वयाखालील बालकांना या लसीकरणाच्या अभियानापासून वंचित न ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आजचा दिवस 'पोलिओ रविवार' तसंच 'पल्स पोलिओ दिवस' म्हणूनही ओळखला जातो. 


भारतात पोलिओ लसीकरणाच्या अभियान कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच वर्षाखालील कमी वयाच्या लहान मुलांना हे लसीकरण देण्यात येतं. पोलिओ लसीकरण मोहीम वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. ही लसीकरण मोहीम सहसा सुरुवातीच्या काही महिन्यांत घेण्यात येते. 


लसीकरणादरम्यान बालकांना पोलिओचं इंजेक्शन दिलं जातं आणि प्रत्येक वेळी मुलाला तोंडी पोलिओच्या स्वरूपात औषध देण्यात येतं. पोलिओची लस आवश्यक आहे कारण पोलिओ अद्याप पूर्णपणे नष्ट झालेला नाही. 


2012 पासून भारत पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे. परंतु काही एक-दोन देशांमध्ये हा विषाणू सक्रिय असल्याची माहिती आहे. प्रत्येक पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, जोपर्यंत हा विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत मुलांना पोलिओचं औषध देणं आवश्यक आहे.