विष्णु करोले, झी मीडिया, बीड: सध्या संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या शिवीगाळ प्रकरणावरून सगळीकडेच वातावरण पेटलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण (Maharashtra Politics) तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सध्या अशीच एक टीका शरद कोळी (Sharad Koli) यांनी बांगर आणि गुलाबराव पाटील यांच्यावर केली आहे. सध्या (Latest political update) या पेटलेल्या प्रकरणावर अंबादास दानवे (Abbadas Danve) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संतोष बांगर यांच्या शिवीगाळ प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. सध्या चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य चर्चेत आहे. (political leader chandrakant khaire attacks on santosh bangar on his controversy on using bad words)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गट आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) पुन्हा वादात चर्चेत आलेत. काल दुपारी 12 आसपास मंत्रालय गार्डन गेट येथून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा यावरून पोलिसांसोबत हुज्जत घातली. बांगर यांनी यावेळेस काही पोलिस कर्मचारी यांना शिवीगाळ ही केल्याचे समजते. आमदार बांगर आणि पोलिस यामधील वाद सोडवण्यासाठी अखेर काही वरिष्ठ पोलिस अधिकारी मध्यस्ती केली. बांगर या आधी ही शासकीय कार्मचारी मारहान करणे शिवीगाळ करणे यावरून वादात अडकले आहेत.


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


संतोष बांगर प्रकरणावर चंद्रकांत खेैरेंची टीका... 


बांगर नेहमी वादात असतात, मारहाण करतात. त्याचे सगळे धंदे पोलीसांना माहीत आहेत. भारतीय जनता पार्टी (BJP) यांना कसं सहन करतात? संघ, फडणवीसही त्यांना कसं सहन करतात. पूर्वी कट्टर शिवसैनिक होता परंतु आता तो नाही, अशी खळबळजनक टीका चंद्रशेखर खैरे यांनी केली आहे. नवनवीन राणा 5 ते 6 दिवस कुठे होत्या? बचू कडू (Bacchu Kadu) बोलत होता तेव्हा गायब होत्या. वाद मिटला आणि आता समोर आल्या आहेत. अब्दुल सत्तार खोड्या करणारा माणूस आहे. 17 पक्ष फिरून आलाय. सरड्या सारखा रंग बदलतो. त्यांनी मुंबईत एकाच वेळी सभा ठेवून हास्य करून घेतलं. तो माणूस पैसे गोळा करून माणसं आणेल मात्र आमची सभा यशस्वी होईल. 


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही झालाच तर भांडण वाढतील..


आंबदास दानवे यांनी राज्यात काम करावं, ते काम करत आहेत. इकडे कार्यकर्ते आहेत इकडचे काम ते करतील, मी सुद्धा इकडे आहे, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटांमध्ये जोरदार वादळं सुरू झालं आहे. त्यामुळे सगळीकडेच राजकीय वातावरण तापलं आहे. याचा पडसाद आता सगळीकडेच उमटायला लागला आहे. तेव्हा आता मंत्रिमंडळं विस्ताराच्या पाश्वभुमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंगागण पेटले आहे.