Pradnya Rajeev Satav: राजीव सातव यांच्या पत्नीवर गंभीर हल्ला, जीवाला धोका म्हणत दिली माहिती
Pradnya Rajeev Satav: `महिला आमदारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला.... भ्याड हल्ला काय करता समोर या`, म्हणत केला संताप व्यक्त
Pradnya Rajeev Satav: महाराष्ट्रात लोकशाहीला हादरा देण्याची घटना घडल्याचं वृत्त समोर आल्यामुळं एखच खळबळ माजली आहे. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी, प्रज्ञा सातव यांच्यावर एका अज्ञात इसमानं भ्याड हल्ला केला. खुद्द प्रज्ञा सातव यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांच्यात मतदार संघातील कसबे धवंडा या गावात असतानाच हा हल्ला करण्यात आला. याविषयी ट्विट करत विधानपरिषदेच्या आमदार असणाऱ्या प्रज्ञा सातव यांनी लिहिलं, 'आज माझ्यावर कळमनुरीतील कसबे धवंडा येथे निर्घृण हल्ला करण्यात आला. एका अज्ञात इसमानं पाठीमाहून येत हा हल्ला केला. मला इजा पोहोचवण्यासाठीचा हा एक गंभीर प्रयत्न होता. ज्यामुळं आता माझ्या जीवाला धोका आहे. एका महिला आमदारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला. समोर या, असे भ्याड हल्ले काय करता....'
माझ्या लोकांसाठी काम करतच राहीन...
हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना धवंडा गावात एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी त्या तिथं गेल्या होत्या. तेव्हाच हा हल्ला करण्याता आला. या हल्ल्यानंतर सोशल मीजियाच्या माध्यमातून त्यांनी आपण सुखरूप असल्याचं सांगत माझ्या लोकांसाठी कायमच काम करत राहीन असा शब्दच समर्थकांना दिला. सातव यांचे आशीर्वाद आपल्यापाठी असल्याचं म्हणत सावित्रीबाऊ फुले, इंदिराजी यांच्यासारख्या थोर व्यक्तींवरील हल्ल्यांचे संदर्भ त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्मातून दिले. आपल्यावरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.
प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला म्हणजे गंभीर बाब... - सुप्रिया सुळे
दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी आपल्यावरील हल्ल्याची माहिती दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला. 'विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कसबे धवंडा, ता. कळमनुरी येथे झालेला हल्ला ही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे. माझी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की तातडीची बाब म्हणून प्रज्ञा सातव यांना सुरक्षा द्यावी. या प्रकरणाची कसून चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे', असं ट्विट त्यांनी केलं.