Modi Cabinet Expansion : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'ची SUPER EXCLUSIVE बातमी. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाला ( Shinde Group) केंद्रात आता तीन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Maharashtra Political News)  केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. (Narendra Modi Govt) ज्यात शिंदे गटाला  (Eknath Shinde) एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपद मिळू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Political News in Marathi)


या  खासदारांची लागणार मंत्रीपदी वर्णी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election) जवळ आल्या आहेत. मुंबई महापालिका डोळ्यांसमोर ठेवत राहुल शेवाळेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर श्रीरंग बारणेंना मंत्रिपद देत पश्चिम महाराष्ट्रही मजबूत करण्याचा भाजपचा इरादा आहे. 


विदर्भातल्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. नितीश कुमार, उद्धव ठाकरे, सुखबीर सिंह बादल यांनी एनडीएची साथ सोडली. मात्र सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदेंच्या रुपाने भाजपला भक्कम साथीदार मिळाला आहे. तेव्हा भाजपने शिंदे गटाला तीन मंत्रिपदं देण्याचं ठरवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


राहुल शेवाळे आणि जेपी नड्डा यांची भेट



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे 12 समर्थक खासदाराच्या गटाला आणि राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याआधीच मान्यता दिली आहे. ही मान्यता देऊन भाजपने शिवसेना ठाकरे गटाला  (Shivsena) पुन्हा एक मोठा दिला होता. दरम्यान, राहुल शेवाळे यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. नड्डा यांना भाजपच्या अध्यक्ष पदाला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यानिमित्ताने शेवाळे यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्यात.



मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाला केंद्रात स्थान देण्याबाबत ही भेट असल्याचे म्हटले जात आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीवरही चर्चा झाली होती. त्यानंतर जे पी नड्डा मुंबई दौरा करणार आहे. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होती.