``सत्तेसाठी नुसती भांडणं, इकडे मुलगा म्हणत होता, आई माझा Interview झाला नाही``
पोटचा गोळा गमावल्याने स्वपनीलच्या आईवर (Swapnil Lonkar Mother) दुखाचा डोंगर कोसळलाय.
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष (Opposition) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळतोय. सत्ताधारी सत्तेच्या खुर्चीला खेटून आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक सत्तेसाठी आकंड तांडव करतायेत. पण या सर्वात सर्वसामान्यांच्या समस्यांकडे डोळेझाकपणा केला जातोय. सरकारी अनास्थेमुळे आणि विरोधकांच्या आक्रस्ताळेपणामुळे सामन्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. याच सरकारी अनास्थेने 24 वर्षीय स्वपनील लोणकर (Swapnil Lonkar) या 2 वेळा एमपीएससी (MPSC) परीक्षा पास झालेल्या तरुणाचा घात केलाय. स्वपनील मुख्य परीक्षेत (MPSC Main Exam) 2 वेळा उत्तीर्ण झाला. मात्र त्यानंतरही नोकरी नसल्याच्या तणावातून आणि घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याने आत्महत्या (Suicide) करत जीवन संपवलं. (politician Just a fight for power, sun saying here my was not interviewed, Swapnil Lonkar Mother statement)
पोटचा गोळा गमावल्याने स्वपनीलच्या आईवर दुखाचा डोंगर कोसळलाय. स्वपनीलच्या घरच्यांनी हालअपेष्ठा सहन करुन स्वपनीलला इथवर पोहचवलं. दुखं सहन केल्यावर आता कुठे घरच्यांना सुखाचे दिवस दिसू लागले होते. आज नोकरी लागेल, उद्या लागेल, या आशेवर स्वपनील आणि त्याच्या घरचे होते. पण अखेर स्वपनीलचा बांध तुटला. स्वपनीलने अखेर आत्महत्या केली. या सर्व प्रकरणानंतर स्वपनीलच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया कोडग्या झालेल्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजण घालणारी आहे.
स्वपनीलच्या आईची प्रतिक्रिया
"दुसऱ्यांचा विचार करा, आणि त्यांच्या आई वडिलांचा विचार करा, की त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावलीये. आमची काय परिस्थिती आहे, ती आमच्या कुटुंबियांना माहितीये. स्वपनीलला कसं शिकवलं, तो हुशार होता. तिथवर त्याला कसं पोहचवलं. तिथवर पोहचायच्या आधी सरकारने मुलांना आत्महत्येला प्रवृत्त करावीत", असा उद्विघ्न सवाल स्वप्नीलच्या आईने उपस्थित केला.
मंत्र्यांना तळतळाट
"माझा तळतळाट आहे हा, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय सरकारला कळणार नाही की आत्महत्या काय असते आणि मुलगा गमावण्याचं दुख काय असतं यांना नाही कळणार, यांची भाडणं नि फक्त भांडण, अशी संतप्त आणि उद्विघन प्रतिक्रिया या मातेने दिलीये.
"राजकारण्यांना काही देणं घेणं नाही. कोण किती करतंय अन किती झुरतंय याचं यांना काही देणंघेणं नाही, यांच फक्त राजकारण सुरु आहे", असही स्वप्नीलच्या आईने म्हटलं.
"माझा मुलगा किती झुरला मला माहिती"
"मला माहितीये माझं पोरगं किती झुरायचं, 2 वर्ष त्याने किती झुरुन घेतलंय ते. इंटरव्यू झाला नाही आई माझा इंटरव्यू झाला नाही. मी पास झालो तरीही इंटरव्यू झाला नाही, असं तो मला नेहमी म्हणायचा", असंही स्वपनीलच्या आईने नमूद केलं. मुलाला गमावल्यानंतर या मातेला अश्रू अनावर झाले. ज्या बालकाला लहानाचं मोठं करुन अधिकाऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी मेहनत घेतली, त्याचा घात या सरकारच्या अनास्थेने झाल्याचं या मातेला पाहिल्यावर समजून येतं.
"राजकारण्यांना देणं घेणं नाही"
"राजकारण्यांना काही देणं घेणं नाही. यांची यांची मुलं सुरक्षित आहेत.गरिबाची काय कितीही मुलं गेली तरी यांना काही देणं घेणं नाही", असं या मातेने म्हटलं. आता किमान स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर तरी इतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार लक्ष घालेल की आणखी स्वपनीलच्या आत्महत्या होण्याची वाट पाहणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
MPSC मायाजाल आहे, यात पडू नका!, आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र