बीड : बीडमधल्या पूजा चव्हाण या टिकटॉक स्टार तरुणीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी आरोप केलेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात चक्र फिरवली जातायत तसे मृत्यूचे धागेदोरे अधिक गडद होत चाललेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजाच्या मृत्यू प्रकरणी आज पूजाच्या गावी पुणे पोलिसांचं एक पथक देखील रवाना झालं असून तपास सुरू आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने मृत्यूला अनेक कंगोरे असल्याचं देखील स्पष्ट होतय. मात्र असलं तरी पोलीस यावर बोलायला तयार नाहीये.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार खासदांची बैठक बोलावलीय. या बैठकीला सुरूवात झालीय. या बैठकीला पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळे वादात अडकलेले वनमंत्री संजय राठोड उपस्थित नाहीत. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना मंत्री आणि पदाधिका-यांची पहिल्यांदाच एकत्रित बैठक होणार आहे.



पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोडांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राजीनामा दिलेला नसला तरी शिवसेनेतील एक गट राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची चर्चा असल्याची माहिती कळतेय.


 वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिलीय. तर भाजपची महिलांबाबतची डझनभर प्रकरणं सांगता येतील मात्र भाजपबाबत नैतिकता संपुष्टात येते अशी प्रतिक्रिया मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिलीय.


पूजा चव्हाण नावाच्या टिक टॉक स्टार तरुणीच्या मृत्यूनंतर आता तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक पहिल्यांदाच मीडियासमोर आलेत... आमच्या मुलीची बदनामी थांबवा, अशी कळकळीची विनंती पूजाच्या वडिलांनी केलीय. तर कथित ऑडिओ क्लिपमधला आवाज अरुण राठोडचा नाही, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.