अमरावती : शेतकऱ्यांसाठी आयोजित कृषी विकास परिषदेत चक्क अश्लील नृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने वरुडमध्ये ही परिषद आयोजित केली होती. मात्र इथे एका युवतीसोबत निवृत्त कृषी अधिकाऱ्याने अश्लील नृत्य केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


या अश्लील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्यासपीठावर सुरू असलेला हा धिंगाणा कमी होता म्हणून की काय, उपस्थित मंडळींपैकी काहीजण तिथं येऊन पैसेही उधळत होते. हा धिंगाणा पाहून शेतकऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन मिळणार होतं, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.