COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा : गोव्यात दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. दहशतवादी सागरी मार्गाने गोव्यात घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. गोव्याचे बंदर खात्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी याबाबतची माहिती दिलीय. मच्छिमारी करणा-या बोटीतून हे दहशतवादी गोव्यात दाखल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय. याबाबत भारतीय तटरक्षक दलाकडून माहिती मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. गोव्यासह मुंबई आणि गुजरातलाही दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे असंही साळगावकर यांनी म्हटलंय.


अतिदक्षतेचा इशारा  


 याच पार्श्वभूमीवर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. गोवा हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. देशविदेशातले अनेक पर्यटक इथं येत असतात. त्यामुळे गोव्यात सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलीय.