Food Inflation: मटण थाळी स्वस्त, शाकाहार महागला; मे महिन्यात अशी वाढली महागाई
उष्णता वाढल्याने भाज्या, फळं आणि डाळी महागल्या आहेत. पाऊस पडेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत हीच स्थिती राहणार असल्याच सांगितलं आहे. कांद्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 27.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळी देखील महागली आहे.
Food Inflation: मे महिन्यात शाकाहारी थाळीचा दर 9 टक्क्यांनी वाढला आहे. एका रिपोर्टनुसार कांदा, टोमॅटो आणि बटाटा यांच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस ऍण्ड ऍनालिसीसमध्ये, शाकाहारी थाली वाढण्याची कारणे सांगितली आहेत. तर ब्रॉयलर चिकनमध्ये घट पाहायला मिळत आहे. यामुळे मांसाहार थालीचा दर कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 27.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळी देखील महागली आहे.
भाज्या जसे की, कांदे, टोमॅटो आणि बटाटे, भात, रोटी, डाळ, दही आणि कोशिंबीर यांचा समावेश असलेल्या शाकाहारी थाळीची किंमत मे महिन्यात 27.8 रुपये प्रति थाळी आहे. जी गेल्या वर्षी याच काळात 25.5 रुपये होती आणि जी त्यावेळी काहीशी जास्त होती.
टोमॅटोच्या दरात 39 टक्क्यांनी वाढ
शाकाहारी थाळीमध्ये सामान्यतः रोटी, भाज्या (कांदा, टोमॅटो आणि बटाटा), तांदूळ, डाळी, दही आणि कोशिंबीर यांचा समावेश होतो. टोमॅटोच्या किमतीत 39 टक्के, बटाट्याच्या 41 टक्के आणि कांद्याच्या दरात 43 टक्के वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमतीत एकूण वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, 'पश्चिम बंगालमध्ये रब्बी पिकाच्या क्षेत्रात मोठी घट आणि बटाट्याची कमी आवक यामुळे कांद्याची आवक कमी झाल्याने या भाज्यांचे भाव वाढले आहेत.'
बटाटा महागल्याचे कारण
बटाट्याचा दर महागल्याचं कारण पश्चिम बंगालमधून येणार अवाक कमी झाली आहे. तसेच रब्बी हंगामातील लागवड कमी झाल्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. तांदूळ आणि डाळींच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ही वाढ अनुक्रमे 13 टक्के आणि 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मांसाहार थाळी कमी होण्याचे कारण
मांसाहारी थाळीतील अनेक घटक शाकाहारी थाळीसारखेच असतात, मात्र डाळीऐवजी चिकनचा समावेश त्यात होतो. ब्रॉयलर चिकनच्या किंमतीत 16 टक्क्यांची घट झाली असल्यामुळे या थाळीच्या दरात घट झाली आहे. मे महिन्यात मांसाहारी थाळीच्या किंमतीतील घसरणीचे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
डाळींच्या दरात वाढ होण्याचे कारण
तांदूळ आणि डाळींच्या दरातही अनुक्रमे 13 टक्के आणि 21 टक्के वाढ झाली आहे. तर जीरे, मिरची आणि तेलाच्या दरात अनुक्रमे 37 टक्के, 25 टक्के आणि 8 टक्के घट झाल्याने शाकाहारी थाळीच्या किमतीत आणखी वाढ झाली नाही. मे महिन्यात ते 55.9 रुपयांपर्यंत खाली आले होते, तर एका वर्षाच्या आधी याच कालावधीत ते 59.9 रुपये होते. एप्रिल 2024 मधील प्रति प्लेट 56.3 रुपयांच्या किंमतीपेक्षा ही किंमत कमी आहे.
मांसाहारी थाळीमध्ये इतर पदार्थही असतात. पण डाळींऐवजी ब्रॉयलर चिकन असते. ब्रॉयलर चिकनच्या किमतीत 16 टक्क्यांनी झालेली घट हे मांसाहारी थाळीच्या किमतीत घट होण्याचे प्रमुख कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. मांसाहारी थाळीच्या एकूण खर्चापैकी 50 टक्के वाटा ब्रॉयलरचा असतो