रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्याचा प्रकार ताजा असतानाच मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सांगलीच्या मिरजेतील शासकीय मेडिकल कॉलेजचे सिव्हिल हॉस्पिटल कायमच या ना त्या कारणांमुळे चर्चेत असते. शवविच्छेदनासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून कापड आणि इतर साहित्यासाठी २ ते ३ हजाराची मागणी केली जाते. आता मात्र बेकायदेशीररित्या कार्यरत असणाऱ्या झीरो कर्मचाऱ्यांकडून मृतांच्या नातेवाईकांची लूट सुरु आहे... नागरिकांनी स्टिंग ऑपरेशन करुन हा प्रकार उघड केलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकाराकडे हॉस्पिटल प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे यांनी केलाय. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलंय.  


सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लुटण्याच्या या प्रकाराने मिरज सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार चव्हाट्यावर आलाय. रुग्णालय प्रशासन या प्रकरणी कारवाई करणार असं म्हणतंय. मात्र असे प्रकार रोखण्यासाठी कडक पाऊलं उचलण्याची गरज आहे.