Pradeep Kurulkar Sexully Harassed Women: हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप असलेल्या प्रदीप कुरुलकरसंदर्भात (Pradeep Kurulkar) नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. डीआरडीओमध्ये संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या प्रदीप कुरुलकरने डीआरडीओतील कामाची कंत्राटे देताना 2 महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कोर्टात दाखल केलेल्या दोषाराेपपत्रातून (चार्टशीटमधून) ही माहिती समोर आली आहे.


2 महिलांवर अत्याचार केल्याचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदीपने पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्यासंदर्भातील प्रकरण समोर आल्यानंतर एटीएसने या प्रकरणात तपास सुरु केला. एटीएसच्या या तपासादरम्यान प्रदीप कुरुलकर मुंबईतील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमधे 6 वेगवगेळ्या महिलांना भेटल्याचं समोर आलं आहे. या महिलांना कुरुलकर भेटल्याचा संपूर्ण घटनाक्रम गेस्ट हाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हे फुटेज आता एटीएसच्या हाती लागले आहेत. या फुटेजच्या आधारे महिलांचा शोध घेण्यासाठी एटीएसकडून तपास सुरु करण्यात आला. या तपासात डीआरडीओच्या कॅम्पसमधील वेगवेगळ्या कामांची कंत्राटे देण्यासाठी प्रदीप कुरुलकरने 2 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर प्रदीप कुरुलकरने झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी हेर महिलेला भारतीय क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती दिल्याचा आरोप आहे. झारा दासगुप्ता या नावाने पाकिस्तानी गुप्तचर बनावट अकाऊंट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.


1 हजार 837 पानांची चार्जशीट


एटीएसने कुरुलकरविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्यासमोर 1 हजार 837 पानांची चार्जशीट नुकतीच दाखल केली. कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताशी सोशल मीडियावरुन केलेल्या संवादाची प्रत एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटसोबत जोडली आहे. या संवादातून कुरुलकरने झाराबरोबर अग्नि, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.


संवेदनशील माहिती पुरवली


फक्त शरीरसुखासाठी कुरुलकरने झारासोबत (Pakistani Agent) राफेल विमानांपासून ते अग्नी, ब्राम्होस क्षेपणास्त्राची गुपितं फोडल्याचं एटीएसने म्हटलं आहे. एवढंच नाही तर मध्यम पल्ल्याचं मानवरहीत हवाई क्षेपणास्त्र रुस्तम, मानवरहित कॉम्बॅट एअर व्हेइकल्स, DRDO चा ड्रोन प्रकल्प अशा अनेक संवेदनशील प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण कुरुलकरने केल्याचंही उघड झालं आहे. व्हॉट्सअॅप तसेच इन्स्ट्राग्राम, बिंग चॅट आणि क्लाऊड चॅटच्या माध्यमातून कुरुलकरने पाकिस्तानी एजंटला देशाच्या सुरक्षेसंदर्भातील ही अत्यंत संवेदनशील माहिती पुरवल्याचं एटीएसने म्हटलं आहे.


'या' 2 चाचण्यांसाठी याचिका


कुरुलकर आणि झारा दासगुप्ता हे व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात होते. त्यासोबतच दोघेही बिंग चॅट आणि क्लाऊड चॅट या अप्लिकेशनवरूनही माहितीची देवाण घेवाण करत होते. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु असून सरकारी पक्षाने कुरूलकरची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर चाचणी करण्याच्या मागणीसंदर्भात याचिका दाखल केली आहे. कुरुलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.