Prajakta Mali: भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल अपमानास्पद विधान केले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत या विधानाचा निषेध केला. तसेच सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. रविवारी तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता राज्याच्या महिला आयोगाकडून महत्वाची पाऊले उचलण्यात येत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्ता माळी यांचा अर्ज मुंबई पोलीस, बीड पोलीस सायबर पोलिसांना पाठवला आहे. यासंदर्भात पोलिसांनी आम्ही निर्देश दिले असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. प्राजक्ता माळी हे निमित्त आहे पण सोशल मीडियामुळे अनेक गैरप्रकार घडतात. शनिवारी प्राजक्ता माळी यांची तक्रार आमच्या कडे आली. चारित्र्य हनन केले जात असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 


भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर केलेल्या बातम्या बदनाम करणाऱ्या आहेत असं तक्रारीत म्हटलं आहे.संबंधित पोलीस यंत्रणांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या. 


अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अश्लाघ्य कमेंट करणं बदनाम करणं नव्हे. यूट्यूब चॕनल निघालेयत. रिच वाढवायला तिथे वाट्टेल ते टाकले जात आहे.त्यांच्यावरसायबर थ्रू कारवाई केली जाईल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. 


करुणा मुंडे यांनी केलेल्या 3 तक्रारींचे निराकरण राज्य महिला आयोगाने केलं आहे.याबाबत त्यांनी स्वतः आयोगाचे अभिनंदन केलं असल्याचे रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.


काय म्हणाली प्राजक्ता?


महिला म्हणून ही बाब मला अतिशन निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे शोभत नाही. सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, असे ती यावेळी म्हणाली.लोकप्रतिनीधी यावर टिपण्णी करतात. यांना लोकांनी निवडून दिलंय. हे आपल्यावर चिखलफेक करतात. पण काल सुरेश धस यांनी वक्तव्य केल्याने आज मला बोलावं लागलं. लोकप्रतिनिधीला लाखो लोकं फॉलो करतात. एखादी गोष्ट खरी असल्याचे ते भासवतात, असे त्यांनी यावेळी म्हटले.तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही कलाकार आहोत. या सर्वात तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा संबंध काय?  महिला कलाकारांचीच नाव का येतात? पुरुष कलाकारांची नाव का येत नाहीत. कष्ट करुन नाव कमावणाऱ्या महिलांच्या नावाची बदनामी का करता. त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नाव घेतली. कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं, प्रेक्षकांचे मनोरंजन करणं हे कलाकारांचे काम आहे. मी याआधीही करत राहिले आणि पुढेही काम करत राहीनं, असे प्राजक्ता माळी यांनी यावेळी म्हटलं.