शशीकांत पाटील, झी मीडिया, लातूर : शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आता वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उतरले आहेत. शरद पवार हे शिखर बँकेचे कधीही डायरेक्टर नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे ? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी यावेळी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांचे राजकीय कट्टर विरोधक मानले जातात, तरी देखील त्यांनी परखड शब्दात ईडीला सवाल केल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर या प्रकरणात शरद पवार यांना अटक होणार असेल, तर या घोटाळ्यात नेमका शरद पवार यांचा काय रोल होता हे जनतेला सांगावे,  असा सवाल यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.



जनतेपासून हे लपवून न ठेवता ईडीने याचा खुलासा करावा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. जर ईडीने हे केलं नाही, तर ईडीचा राजकीय वापर होत असल्याचे उघड होईल, असे आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. प्रकाश आंबेडकर हे लातूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यानंतर ते बोलत होते.