`त्या` गावावर दंडात्मक कारवाई करा- प्रकाश आंबेडकर
भारिप बहुजन महासंघ त्यांच्या मागे उभा राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय.
जळगाव : मातंग समाजाच्या मुलांच्या मारहाण प्रकरणात बघ्याची भूमिका घेणा-या गावावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केलीये. या घटनेबाबतची केस मागे घेण्यात यावी असा दबाव संबंधित मुलांच्या कुटुंबीयांवर येत आहे. मात्र भारिप बहुजन महासंघ त्यांच्या मागे उभा राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय. ' जसा राजा तशी प्रजा ' अशी प्रतिक्रिया या घटनेबाबत प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.... तर ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिलीये..
राहुल गांधींचं ट्विट
जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधल्या मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण केल्याच्या घटनेवर राहुल गांधींनी ट्विट केलंय. अशा घटनांना भाजप आणि आरएसएसचा मनुवाद जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या जातियवादाविरोधात संघर्ष केला नाही तर इतिहास माफ करणार नसल्याचं ट्विट त्यांनी केलंय. जामनेरचा विषय हा जातीयवादातून नव्हे तर गावातल्या भांडणातून घडलाय. त्यामुळे विषय समजून न घेताच राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया दिल्याचा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिलीय.