Prakash Ambedkar : वंचित बहूजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलीय... वंचितने विधानसभेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय... यामध्ये प्रथमच तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य देण्यात आलंय.. रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी समुदायाच्या शमीभा पाटील यांनी उमेदवारी देण्यात आलीय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीसोबत जाणार का अशा प्रकारच्या चर्चा मागील काही काळापासून सुरू होत्या. तशा गाठीभेटी आणि बैठका सुरूही होत्या.. तिसऱ्या आघाडीसोबत न जाण्याचं नेमकं कारण काय याबद्दलही आंबेडकर यांनी भूमिका मांडलीय..


प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.. त्यामुळे मविआ आणि महायुतीसमोर आंबेडकर यांनी मोठं आव्हान उभं केलंय.. 


वंचितच्या उमेदवारांची यादी


रावेर - शमिभा पाटील
सिंधखेड राजा - सविता मुंडे 
वाशिम - मेघा डोंगरे
धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण-पश्चिम -  विनय भांगे
साकोली - डॉ. आविनाश  नान्हे 
नांदेड दक्षिण - फारुख अहमद 
लोहा - शिवा नरांगळे 
संभाजीनगर पूर्व - विकास दांडगे  
शेवगाव - किसन चव्हाण 
खानापूर  - संग्राम माने