वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर, रिंगणात उतरवले 11 उमेदवार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
Vanchi Bahujan Aaghadi Candidate List : लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सोलापूर, माढा, सातारा, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीने ट्वीटरवर लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचितच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-जमातींना स्थान देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचितच्या दुसऱ्या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वीच पहिली यादी जाहीर केली होती. यात 8 लोकसभा उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आता दुसऱ्या यादीत त्यांनी 11 जागांवरील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत वंचितने 19 लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार
हिंगोली - डॉ. बी.डी चव्हाण
लातूर - नरसिंह राव उदगीरकर
सोलापूर- राहुल काशीनाथ गायकवाड
माढा - रमेश नागनाथ बारसकर
सातारा - मारुती धोंडीराम जानकर
धुळे - अब्दूर रेहमान
हातकंणगले- दादागुड्डा पाटील
रावेर - संजय ब्राह्मणे
जालना - प्रभाकर भाकले
मुंबई उत्तर-मध्य अबूल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - काका जोशी
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील लोकसभेचे उमेदवार
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळूंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार
नागपूर : काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
सांगली: प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार
प्रकाश आंबेडकरांनी एकूण 19 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे, हातकंणगले, रावेर, जालना, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे.