मुंबई : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात मराठी क्रांती मुक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.  राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या 'मराठा क्रांती मूक आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे देखील कोल्हापूरला जाणार आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाला आणखी बळ मिळणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती.


मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली होती. आंदोलनाच्या आधी त्यांनी आज शाहू समाधीस्थळावरुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला तसंच उद्या होणाऱ्या आंदोलनाचा आढावा घेतला. 


खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनापूर्वी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी म्हटलंय. 


कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार असून यानंतर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.