शरद पवार - प्रशांत किशोर यांच्या भेटीमागे हे होते कारण, सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या भेटीनंतर अद्यापही चर्चा सुरुच आहे.
बारामती, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या भेटीनंतर अद्यापही चर्चा सुरुच आहे. (Prashant Kishor meets NCP Chief Sharad Pawar) या भेटीत नक्की काय झाले, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तसेच या दोघांच्या भेटीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आज बारामती दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार - प्रशांत किशोर यांच्या भेटीमागील स्पष्टीकरण दिले आहे. (Supriya Sule's big statement)
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मागच्या आठवड्यात शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक उलट सुलट चर्चना उधाण आले होते. ही भेट शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली होती. या भेटीबद्दल विचारणा केली असता, शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटी दरम्यान मी तिथे नव्हते, असे सुप्रिया सुळे यांनी बारामतीत सांगितले. त्या म्हणाल्या, या भेटीच्यावेळी मी तिथे नव्हते मला माहित नाही, त्या मिटिंगमध्ये काय झाले ते?
दरम्यान, उजनीच्या पाण्यावरून सोलापूर आणि इंदापूर असा वाद पेटलेला दिसतोय. यावर त्या म्हणाल्या व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीवर जास्त विश्वास न ठेवता हा विषय सर्वांनी बसून हातळण्यात यावा आणि मार्ग काढला पाहिजे. याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून या भेटीबाबत अधिकृत खुलासा केला आहे. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. राजकीय वर्तुळात अनेक राजकीय आखाडे बांधले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या भेटीबाबत महत्त्वाचा खुलासा केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याची गरज आहे. येत्या काळात तसे प्रयत्न केले जातील, आणि या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पण रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलीही जबाबदारी दिलेली नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.