Maharashtra News Today: सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ९६ ते १०६ टक्के पाऊस होणार. १० ते ११ जुन दरम्यान मुंबईत पावसाची सुरुवात होणार आहे. १५ जुन पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाला सुरवात होईल. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळं यंदा सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SDRF च्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी. TDRF च्या धर्तीवर महापालीकांनी टीम सुरु कराव्यात आणि विभागनिहाय SDRF च्या टीम तयार कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. तसंच, बचावकामी स्थानिक तरूण ताबडतोब जातात त्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य द्यावेत, अशा सुचनादेखील केल्या आहेत. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेचा महाव्यवस्थापकांनी मॉन्सूनसाठी केलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 


उल्हास नदीवरील बदलापुर बॅरेज येथील ब्रिटीशकालीन पीअर्स हटविण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून महालक्ष्मी एक्सप्रेससारखी परीस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. आर्मी, नेव्ही, इंडियन (एअर फोर्स, कोस्टगार्ड यांनी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला आहे. 


राज्यातील सर्व अनधिकृत होर्डीग्ज काढून टाकावेत. तसंच, असं कोणी आढळल्यास गुन्हे दाखल करावेत. अधिकृत होडींग्ज आहेत त्यांचेही स्ट्रक्चरल ऑडीट करा. मुंबईत MMRDA, रेल्वे यांच्या अखत्यारीत येणारे होर्डिंग्जसाठी मुंबई महापालीकेचा परवाना आवश्यक असणार आहे.  BMC, नॉर्म्स प्रमाणे होडींग उभारण्याच्या सूचना दयाव्यात, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत. 


बैठकीतील प्रमुख मुद्दे 


- राज्यात ४८६ ठिकाणे दरडप्रवण   स्पॉट आहेत. याठिकाणी संबंधित जिल्हाधिका-यांनी दक्षता घेऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.


- जलजन्य आजार साथीचे रोगावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. पुरेशी औषधे, गोळ्या यांचा साठा पुरेसा आहे.


- मध्यप्रदेश संजय सरोवर अलमट्टी धरण यांच्याशी समन्वय ठेवा. म.प्र. तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांशी समन्वय ठेवा.


- प्रत्येक धरणांची तांत्रीक तपासणी ३१ मे पर्यंत पूर्ण होईल.


- प्रत्येक धरणांच्या ठिकाणी वायरलेस यंत्रणा ३१ मे पर्यंत कार्यान्वित होईल.


- वादळी वाऱ्यात वीजपुरवठा सुरखीन रहावा यासाठी उर्जा विभागाने दक्षता घ्यावी.


- संपर्क सुटलेल्या ठिकाणी, औषध पाणी धान्य पुरविण्यासाठण जिल्हाधिका-यांनी कार्यवाही करावी.


- धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवावी, नागरीकांमध्ये जनजागृती करावी.


- नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे


- मुंबईतील रस्त्यांवरील मॅनहोल ना झाकण आणि गर्डर बसविण्यात यावे.


- सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे.