शनि-राहू मिळून करणार कहर! 3 ऑक्टोबरपासून कोणत्या 5 राशींवर सर्वाधिक परिणाम होईल?

Shani Nakshatra Gochar 2024: येत्या 3 ऑक्टोबर 2024 शनि आणि राहू आपली स्थिती बदलणार आहे. शनि ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार असून ज्याचा स्वामी राहू आहे. राहूच्या नक्षत्रात शनीचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करणार आहे. 

Sep 28, 2024, 15:37 PM IST
1/7

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा बनवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे शनीच्या स्थितीत थोडासा बदलही लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडतो. 

2/7

ऑक्टोबरच्या सुरुवातीला शनि मोठा बदल घडवून आणणार आहे. राहूच्या नक्षत्रात शनीचे आगमन अशुभ मानलं जातं. शतभिषा नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे. 

3/7

मेष (Aries Zodiac)

शनि आणि राहू यांची भेट अशुभ असली तरी मेष राशीसाठी चांगली असणार आहे. या लोकांना काही जुन्या समस्येपासून आराम मिळणार आहे. तणाव दूर होणार असून आर्थिक लाभ मिळणार आहे.   

4/7

सिंह (Leo Zodiac)

शनीदेवाची चाल सिंह राशीसाठी चांगला ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक मदत मिळणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगला असून यांना यश मिळणार आहे. 

5/7

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण धन आणि प्रसिद्धी देणारं ठरणार आहे. सर्व आर्थिक समस्या संपणार आहेत. एकामागून एक आर्थिक लाभाच्या संधी या लोकांना मिळणार आहे. 

6/7

कन्या (Virgo Zodiac)

शतभिषा नक्षत्रात शनीचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांचे वैयक्तिक जीवन आनंदाने सुगंधित करणार असणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला असणार आहे. जीवनात सुख-समृद्धी वाढणार आहे.  

7/7

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवूण आणणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे, तुमची प्रतिष्ठाही वाढेल. घरातही आनंद असणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)