उल्हासनगरमध्ये गर्भवती महिलेचा मुलासह मृत्यू
उल्हासनगर शहरातल्या मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गरोदर महिलेचा मुलासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातल्या मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गरोदर महिलेचा मुलासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरती चौहान या महिलेला शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमाराला प्रसूती वेदना होऊ लागल्यानं, उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णलयात भरती केलं होतं. मात्र प्रसूती दरम्यानच तिचा मृत्यू झाला. वेळेवर उपचार न मिळाल्यानं आरतीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी करत, तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
तसंच तिचं पार्थिव रुग्णालय आवारात ठेऊन दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. अखेर माध्यर्ती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अशोक नादापूरकर यांनी या घटनेसाठी डॉक्टर सुहास कदम यांना जबाबदार ठरवत कार्यमुक्त केलं.