कल्याण : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान साहित्याचा वाटप करण्यात असून मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व या चार विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर सर्व साहित्य पोहचविण्याची लगबग सुरु होती. त्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदान केंद्र निहाय कर्मचा-यांना पोहचविण्यासाठी बसेस आणि छोट्या गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. मतदान शांततेत पार पडावे यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे मतदान यंत्रात बिघाड झाल्यास पर्यायी मतदान यंत्राची व्यवस्था करण्यात आली आहे.


मागील निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत सुमारे 45 टक्के मतदान झाले होते. यंदा जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक विभागाकडून जनजागृती मोहीम राबविली होती. त्यामुळे उद्या किती टक्के मतदान होतंय याकडे लक्ष लागलं आहे.