शिर्डी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी (१ ऑक्टोबर) करण्यात आले. शिर्डी हे जगभरातील साई भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विमानतळामुळे शिर्डी हे ठिकाण आता हवाई मार्गाने जोडले गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकार्पण कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सुमारे १९९०च्या दशकात शिर्डी हे हवाई मार्गाने जोडले जावे अशी मागणी पुढे आली होती. आता विमानतळाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण सोहळाही पार पडल्यामुळे शिर्डीकरांचे हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. आतापर्यंचा विचार करता शिर्डीला जायचे म्हटले तर, मुंबईपासून, सुमारे पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून तीन तास प्रवास करुन शिर्डीला जावे लागत असे. मात्र, आता हवाई मार्गाचा वापर केल्यास मुंबई ते शिर्डी हे अंतर अवघ्या ३५ मिनीटांत कापता येणे शक्य आहे.


शिर्डी हे विमानतळ राहता तालुक्यातील काकडी गावाजवळ आहे. सद्यास्थितीत हे विमानतळ केवळ दिवसाच्या प्रवासासाठी खुले असेन. लवकरच रात्रीची विमानसेवाही सुरू करण्यात येणार आहे. रात्रीच्या विमानसेवेसाठी धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू आहे. हे काम जानेवारीत पूर्ण होण्याची शक्यता आहे.