नागपूरसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींची ही माहिती
नाग नदीतलं प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.
नागपूर : नाग नदीतलं प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. नाग नदीच्या शुद्धीकरण आणि सौंदर्यकरण्यासाठी १ हजार २५६ कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलीय.
यात प्रकल्पासाठी जायका ७५१ कोटी रुपये कर्ज देणार आहे. डिसेंपर्यंत निविदा काढून फेब्रुवारीत कामाला सुरूवात केली जाणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं. तसंच नागपूरमध्ये परिवहन इंधन खरेदीवर जीएसटी लागणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.