सिगापूर बंदराचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
जेएनपीटीमधील सिगापूर बंदर प्राधिकरण भारत मुंबई टर्मिनल या चवथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले आहे. आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
नवी मुंबई : जेएनपीटीमधील सिगापूर बंदर प्राधिकरण भारत मुंबई टर्मिनल या चवथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले आहे. आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
देशातील सर्वात मोठे बंदर
सिगापूर बंदर हे देशातील सर्वात मोठं बंदर असणार आहे. हे बंदर दोन किलोमीटरचं असून यातील पहिला एक किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालाय. या बंदरावरून ४५ लाखाहून जास्त कंटेनर्सची हाताळणी करण्यात येणार आहे.
२०२२ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण
पहिल्या टप्प्यासाठी चार हजार ७१९ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. दुस-या टप्प्यासाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२२ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे.
बंदर रेल्वेने जोडणार
हे बंदर रस्ता आणि रेल्वेने जोडणार असून यामुळे जेएनपीटी बंदराची कंटेनर हाताळणी क्षमता वाढणार आहे.