`ठाणे जेलमध्ये कैद्याला मारहाण, विष्ठा दिली खायला`
येथील जेलमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आलाय. याबाबत आमदार रमेश कदम यांनी गंभीर आरोप केलाय. जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला जबर मारहाण करुन मानवी विष्ठा खायला लावली. त्यानंतर या कैदाची प्रकृती बिघडली असल्याचे कदम यांनी म्हटलेय.
ठाणे : येथील जेलमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आलाय. याबाबत आमदार रमेश कदम यांनी गंभीर आरोप केलाय. जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला जबर मारहाण करुन मानवी विष्ठा खायला लावली. त्यानंतर या कैदाची प्रकृती बिघडली असल्याचे कदम यांनी म्हटलेय.
कैदी मंजुला शेट्टे प्रकरणाची पुरावृत्ती, येथे घडल्याचे आमदार रमेश कदम यांचा आरोप आहे. ठाणे जेल प्रशासनावर आमदार कदम यांनी गंभीर आरोप केलेत. २७ जुनला एक धक्कादायक घटना घडली. आपले म्हणणे खरे असून सीसीटीव्ही तपासण्याची मागणी आमदार रमेश कदम यांनी केलेय. याबाबत त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.
जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला जबर मारहाण केली. ते एवढ्यावर न थांबता वाईट आणि हिन वागणूक दिली. कैद्याला मानवी विष्ठा खायला लावली. या प्रकरणानंतर त्या कैद्याची प्रकृती बिधडली होती, असे त्यांनी म्हटलेय. दरम्यान, याप्रकरणी मानवाधिकार आयोगाने जेल प्रशासनाला समन्स पाठवले आहेत.