औरंगाबाद : भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसोबत यायचे असल्यास हायकमांडशी चर्चा करावी लागेल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झालेय. त्यामुळे भाजपला काँग्रेसने इशाराही दिल्याचे बोबले जात आहे.


भाजप साथ सोडणार नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आघाडीसंदर्भातले सर्व निर्णय दिल्लीत होतात त्यामुळं दिल्लीतच या बाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. मात्र भाजप शिवसेनेची कोणत्याही परिस्थितीत साथ सोडणार नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून भाजप शिवसेनेला सोबत ठेवतीलच असंही पृथ्वीराज चव्हाणांनी नमूद केलंय. 


भाजपला  हरविणे सोपे होईल!


सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला हरवणे सोपे होईल, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद येथे केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.  भाजप शिवसेनेला सोडेल असं वाटत नाही, असंही ते म्हणालेत.


सेनेचा स्वबळाचा नारा, तरीही...


स्वबळावर निवडणुका लढविण्याची शिवसेनेनं घोषणा केली आहे. तरी साम दाम दंड भेट वापरून शिवसेनेला सोबत भाजप ठेवेल, असेही ते म्हणालेत. काँग्रेस सगळे समविचारी पक्ष घेऊन पुढं जाणार, चर्चा सुरु आहे, की शिवसेना काँग्रेस सोबत येणार. मात्र यात काही तथ्य नाही, आणि शिवसेनेला सोबत यायचं असेल तर याचा निर्णय मी घेऊ शकत नाही, ते आमच्या पक्ष प्रमुखसोबत बोलून निर्णय घेऊ शकतात असंही चव्हाण म्हणालेत.