सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी आपल्या खासदारकीचा तीन महिन्यातच राजीनामा दिला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लागणार आहे. भाजपकडून उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोण निवडणूक लढविणार याची चर्चा सुरु झाली होती. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार, अशी सूत्रांकडून माहिती पुढे आली. त्यामुळे उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत होईल, अशी चर्चा सुरु झाली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणू न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा त्यांनी खुलासाही केला आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढविणार असतील तर राष्ट्रवादीने हा मतदार संघ सोडण्याचा विचार केला होता, अशीही माहिती पुढे आली. दरम्यान, उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने तेथील जागा शिवसेनेने सोडल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्याआधी या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काही दिवसांत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना साताऱ्यातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, उदयनराजेंकडून पराभव पत्करावा लागला होता. ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. मात्र, आता उदयनराजे हे भाजपमध्ये दाखल झाल्याने त्यांनी या जागेवर दावा केला आहे. 


सातारा लोकसभा जागेवर उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने येथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्याविरोधात कोण, असणार याची चर्चा आहे. दरम्यान, अशीही चर्चा आहे की, शिवसेनेने येथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे नरेंद्र पाटील नाराज आहेत. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरु शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.  तर पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने राष्ट्रवादीकडून कोण निवडणूक रिंगणात उरणार याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे काही दिवसात सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.