भंडारा : खाजगी आश्रम शाळेच्या हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी हा हलगर्जीपणा शाळेतील मुलाच्या जीवावरचं बेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील आंबागड येथील बापूजी आदिवासी आश्रम शाळेतील महेंद्र धर्मदास सलामे या नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे जागीचं मृत्यू झाला आहे.


आश्रम शाळेच्या ढिसाळ कारभारामुळे हा दुर्देवी मृत्यू झाल्याचा आरोप आदिवासी संघटनेनं केला आहे. दरम्यान संबंधित संस्था चालकावर कारवाईची मागणी संघटनेनं केली आहे.


 खाजगी संस्था शासनानं बंद करव्यात आणि मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.