नागपूर : राज्यातील अनेक राजकारण्यांनी त्यांची स्वतःची डेअरी सुरु केली. सरकारची चांगली चालणारी डेअरी बंद करून दुधाचे भाव पडल्यानं दुधाचा व्यवसाय खाली गेल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपुरात मदर डेअरीच्या दुग्ध शाळेच्या उद्घाटननंतर आयोजित दुध उत्पादकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आणि खासकरून विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा व्यवसाय खाली येण्यास राजकारणी जबाबदार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आरोप केला. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पशुपालन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर या मेळाव्यात उपस्थित होते.