शेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार
राज्य सरकारनं शेतक-यांच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश दिले असले तरी, हा दर द्यायला खाजगी दूध उत्पादक तयार नाहीत.
पुणे : राज्य सरकारनं शेतक-यांच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश दिले असले तरी, हा दर द्यायला खाजगी दूध उत्पादक तयार नाहीत. पुण्यात एका खासगी हॉटेलमध्ये सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संस्थांची बैठक झाली. त्यात सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे दर द्यायला, खासगी दूध उत्पादकांनी असमर्थता व्यक्त केली.
त्याचवेळी सहकारी दूधसंघ मात्र सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे शेतक-यांना दर द्यायला तयार आहेत. शेतक-यांना द्यायच्या दुधाच्या दराबाबतचा हा प्रश्न असला तरी, ग्राहकांना मात्र नेहमीच्याच दराने दुधाची विक्री करण्यात येणार आहे.