सीसीटीव्ही : सुरक्षारक्षकांची रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण
लातूरच्या शासकीय रुग्णालयात खासगी सुरक्षारक्षकांनी एका महिला आणि पुरूषाला रिंगण करून मारल्याचे उघड झाले.
लातूर : लातूरच्या शासकीय रुग्णालयात खासगी सुरक्षारक्षकांनी एका महिला आणि पुरूषाला रिंगण करून मारल्याचे उघड झाले. सुरक्षा रक्षक मार्ड डॉक्टरांच्या संरक्षणासाठी नेमले गेले आहेत. पण हे रूग्णांच्या नातेवाईकांवरच हात उचलत असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रुग्णांचे नातेवाईक वारंवार आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पोवार यांनी सांगितले. नेमका काय प्रकार समजून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाठविले आहेत. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करू असे वैद्यकीय अधिक्षक अजित नागावकर यांनी सांगितले.
तक्रारीऐवजी मारहाण
शासकीय रूग्णालयात येणारे रुग्ण, नातेवाईक सर्वसामान्य घरातून येतात. त्यामुळे त्यांच्याशी मारहाण करण्याऐवजी बोलून किंवा तक्रार करून प्रश्न सुटला असता असेही म्हटले जाते. या खासगी सुरक्षारक्षकांकडून अनेकदा पत्रकारांनाही अनेकदा सुरक्षारक्षकांकडून विरोध केला जात असल्याचे म्हटले जाते.