Thane Priya Singh Case :  ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक  घटना घडली होती. या प्रकरणात मोठी अपडेटसमोर आली आहे. प्रेयसीला चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. SITकडून अश्वजित गायकवाडसह साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सर्वच्या सर्व 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील, सागर शेडगेला अटक करण्यात आली आहे. अश्वजित गायकवाड हा MSRDC अधिका-याचा मुलगा आहे. प्रेयसी प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी अश्वजितला अटक करण्यात आलेय.  तिघांकडून स्कॉर्पिओ, लँड रोव्हर डिफेंडर कार्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत. 


प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी एसआयटी स्थापन


ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. घटनेची पूर्ण चौकशी एसआयटी मार्फत होणार आहे. एसआयटीमध्ये पोलीस उपायुक्तांचा समावेश करण्यात आलाय. कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यानं फॉरेन्सिक रिपोर्टही तयार केला जाणार आहे. हा हल्ला प्रेमप्रकरणातून झालाय. ठाण्यातील MSRDC अधिका-याचा मुलगा अश्वजीत गायकवाडचे प्रियाशी प्रेमसंबंध होते. मात्र, अश्वजीत विवाहित असल्याची माहिती प्रियाला मिळाली. यावरून घोडबंदर भागात त्यांच्यात टोकाचा वाद झाला. त्यानंतर अश्वजीत आणि त्याचे दोन मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी प्रियाला मारहाण केली. यात प्रिया सिंह गंभीर जखमी झालीय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


त्या दिवशी नेमकं काय घडलं?


ठाण्यात MSRDCच्या अधिका-याच्या मुलाचा क्रूरपणा समोर आलाय.. MSRDC अधिका-याच्या या मुलानं प्रेयसीला चक्क कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसी गंभीर जखमी झालीय, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी MSRDC अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अश्वजित गायकवाडचे प्रिया सिंहसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते.. मात्र, अश्वजीत विवाहित असल्याची माहिती प्रियाला मिळाली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री घोडबंदर भागात त्यांच्यात टोकाचा वाद झाला. त्यानंतर अश्वजीत आणि त्याचे दोन मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी प्रियाला मारहाण केली. त्यानंतर तिला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. यात प्रिया सिंह गंभीर जखमी झाली.याप्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.