Crime News : एक धक्कादायक बातमी. मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे घटना समोर आली आहे. पेइंग गेस्ट म्हणून या विद्यार्थिनीला घरी राहण्यासाठी नेले आणि अत्याचार केल.  हा प्राध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नाट्यशास्त्र विभागात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्याचाराची माहिती पीडितीने प्राध्यापकाच्या पत्नीला दिली असता तिनेही, तुझ्यापासून मुलगा हवा आहे, असे सांगत गुन्ह्यास पाठबळ दिल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री प्राध्यापकासह त्याच्या पत्नीविरोधात बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या सहायक प्राध्यापक असलेल्या अशोक बंडगर याच्या कारनाम्याने विद्यापीठ हादरले आहे. वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत या विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी हा प्राध्यापक घेऊन गेला होता. या कृत्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पती, पत्नीने संगनमताने मिळून माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने मंगळवारी पोलिसांसमोर केला. मंगळवारी रात्री उशिरा बंडगर पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेला धमकावत गेली दोन वर्ष हा प्रकार सुरु असल्याचे पीडितेने सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


दरम्यान, यापूर्वीही या प्राध्यापकाने विद्यार्थींना त्रास दिल्याचे समोर येत आहे. काही विद्यार्थिनीनी विशाखा समितीकडे तक्रारी केल्याची माहिती आहे. दरम्यान, आता तक्रार देणाऱ्या विद्यार्थिनी यांच्या या प्रकरणावर विद्यापीठ काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


दुसऱ्या पत्नीची हत्या, पतीला अटक


दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत जागेच्या वादातून पतीकडून दुसऱ्या पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूर येथे घडली.  जागेच्या वादातून दुसऱ्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. शैलजा नागपुरे असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती बाबाराव नागपुरेला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे.


नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत 56 वर्षीय बाबाराव नागपुरे पहिल्या पत्नीपासून फारकत घेत दुसरी पत्नी शैलजा सोबत राहत होते. हिच्यासोबत बाबाराव यांचा काही दिवसांपासून एका जागेवरुन वाद सुरु होता. या वादानंतर त्यांच्यात भांडण झाल्यानं बाबाराव त्याच्या शिवणगाव पुनर्वसन येथील प्लॉटवर आले होते. थोड्यावेळाने त्यांची पत्नीदेखील प्लॉटवर आली. त्याच जागेच्या विषयाला धरुन दोघात पुन्हा भांडण झाले.


रागाच्या भरात बाबाराव यांनी पत्नीच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये पत्नी शैलजाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला पतीचा शोध घेत ताब्यात घेतले, अशी माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवगडे यांनी दिली.