औरंगाबाद : Prohibition order in Aurangabad city : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये मनाईआदेश लागू करण्यात आले आहेत. औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळेनिदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे 1 मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का,याची मोठी उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावरच औरंगाबाद जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. आजपासून 9 मे पर्यंत हे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी जामावबंदीचे आदेश देत 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश काढला आहे.


तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे. या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलणार असल्याचा अंदाज वर्तावला जात आहे.


केवळ मुंबई पोलिस अ‍ॅक्ट 35 अन्वये आदेश  


पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, औरंगाबाद पोलिसांनी केवळ मुंबई पोलीस कायदा 35 अन्वये आदेश जारी केला आहे. असा आदेश आम्ही वर्षभर काढत असतो. सण-उत्सवांदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, तसेच विविध मिरवणुकींसाठी या आदेशानुसार आम्ही मार्ग सूचवत असतो. मात्र, ही नियमित चालणारी प्रक्रिया असते, असे निखिल गुप्ता यांना स्पष्ट केले.



राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर जारी 


राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सगळं लक्ष हिंदुत्व आणि भगव्यावरच दिसत आहे. मनसेची सभा 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे. सभेला अजून परवानगीही मिळाली नाही. तरीही मनसेकडून मैदानात सभेची तयारी सुरु आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानातच सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.


म्हणून मनाई आदेश


आदेशानुसार मनसेचे मंदिरासमोर हनुमान चालीसा कार्यक्रम आहे, त्याला राजकीय पक्षांचा विरोध आहे. मुस्लिम समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन होण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक कामगार संघटनांकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे. हिजाब मुद्द्याहून आंदोलन होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढी विरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहर संवेदनशील असल्याने प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. ही सगळी कारणे देत औरंगाबादेमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.