धुळे : ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे राजपूत समाजाच्या युवकांनी तापी नदीच्या पात्रात गेल्या २४ तासापासून जल आंदोलन सुरु केलं आहे. 


बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘पद्मावत’ला विरोध म्हणून अनेक तरूण आणि महिला तापी नदीच्या पाण्यात उतरले आहेत. काल रात्री दहा अंश सेल्सीअस तापमानातही हे आंदोलक पाण्यात होते. दोंडाईचा पोलीस या आंदोलकानवर लक्ष ठेवून असून त्याना पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


म्हणून आंदोलन


‘पद्मावत’ हा महाराणी पद्मावती यांच्या इतिहासावर आधारित चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीसाठी राजपूत समाजातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. पद्मावत चित्रपटात महाराणी पद्मावती यांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे समस्त हिंदु धर्मीयांच्या आणि विशेष करुन राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दरम्यान, हा चित्रपट संपुर्ण भारतात प्रदर्शित करु नये तसेच चित्रपटावर कायम स्वरुपी बंदी आणावी, अशी मागणी आंदोलकांनी केलीय. 


...तोपर्यंत बाहेर न येण्याचा निर्धार


यावेळी ‘पद्मावत’ चित्रपट व संजय लीला भन्साळी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पाण्यातून बाहेर न येण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. शिरपूर तालुक्यातही पदमावत विरोधात गेल्या तीन दिवसापासून विविध पद्धतीने आंदोलन सुरूच आहे. काल रात्री एक बस पेटविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.